हसीन जहा ला मिळाली जीवे मारण्याची आणि रेपची धमकी ; राम मंदिरावर केली होती पोस्ट,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाने राम मंदिराच्या भूमी पुजनावर एक पोस्ट लिहिली आहे. परंतु ही पोस्ट लिहिल्यानंतर हसीनला काही जणांनी जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात कालपासून झाली.त्यानंतर हसीनने एक राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर पोस्ट केली होती. ही पोस्ट तिच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या पोस्टनंतर तिला जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे.

हसीन जहाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” समस्त हिंदू समाजाचे श्री राम मंदिरचे भूमी पुजन झाल्याबद्दल अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देशवासियांनी एकत्र येऊन भाईचारा दाखवावा आणि भारताला जगापुढे विश्व शक्ती बनवावे.

हसीनने केलेली पोस्ट नक्कीच वाईट नाही. पण यापूर्वी हसीनने जे काही केले आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टमुळे हसीन ट्रोल झाली आहे. हसीनने यापूर्वी मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर शमीच्या भावाने माझ्यावर रेप केल्याचेही सांगितले होते. त्यामळे चाहते हसीनवर नाराज झाले आहेत.