हातकणंगले तालुक्यातील माणेवाडी गावामध्ये 35 लोकांना जेवणातून विष बाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : माणेवाडी या गावामध्ये मयत दत्तात्रय नारायण पाटील यांच्या उतरकार्य होते. भावकीतून रात्री जेवण आणून जेवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आज पहाटे 5 वाजल्या पासून 24 स्त्री ,9 पुरुष व एक लहान 8 वर्षाचा मुलगा अशा 35 लोकांना संडास ,उलटी, पोटात दुखणे असा त्रास चालू झाल्यामुळे या सर्व रुग्णांना जवळच्या पारगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैधकीय अधीक्षक डॉ. जमादार ,डॉ.ज्योती कांबळे, डॉ. अनिता शहा, डॉ. लाटवडेकर व यांच्या सहित 15 कर्मचाऱ्यांच्या देखरेखे खाली या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Leave a Comment