हार्दिकने पोस्ट केला बाळाचा फोटो ; पहा कसा दिसतो ज्युनिअर पांड्या

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेन्ड नताशा स्टँकोविच यांना ३० जुलै रोजी पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं होतं. लॉकडाउन काळात हार्दिकने नताशा गर्भवती असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली. हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली.

The blessing from God ????????❤️

हार्दिकनं ही आनंदाची बातमी दिल्यानंतर सर्व खेळाडू आणि हार्दिकच्या चाहत्यांनीही दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता त्यानं आपल्या बाळासह रुग्णालयातील एक फोट शेअर केला आहे. देवाकडून आम्हाला मिळालेलं सुंदर गिफ्ट असं कॅप्शनही त्यानं या फोटोला दिलं आहे.

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेन्ड नताशा गर्भवती असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गर्भवती असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here