हुंडा दिला नाही म्हणुन पती म्हणाला तलाक तलाक तलाक!! पत्नीनं केलं असं काही

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | केंद्र शासनाने तीन तलाख प्रथे विरोधी कायदा मंजूर केल्यानंतर शहरात प्रथमच तर राज्यात दुसरा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या पूर्वी ठाणे शहरात एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलीय. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन वेळा तलाख म्हणून निघून गेल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी होऊन मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारेगाव भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा २०१८ मध्ये शेख सलमान शेख लाल याच्यासोबत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. काही दिवस चांगले वागविल्यानंतर दोन लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिचा छळ केला जाऊ लागला. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी सासराच्या मंडळीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केला. विवाहितेच्या छळाला वेगळे वळण देण्यासाठी सासरा शेख लाल शेख युसूफ याने जिन्सी पोलीस ठाण्यात सून हरवल्याची खोटी तक्रार दिली. मात्र पोलीस चौकशीत ही बाब खोटी निघाल्याने सासरची मंडळी अडचणीत आली. त्यांनी जिन्सी पोलिसांसमोर चूक झाल्याचे कबूल करीत माफी मागितली आणि विवाहितेला नांदविण्याची ग्वाही दिली. विवाहिता सासरी जाताच सऱ्याकडून तिची छेडछाड होऊ लागली. याबाबत कोणाला सांगू नको म्हणून सासरा आणि पतीने मारहाण करीत माहेरी आणून सोडले. काही दिवसानंतर पतीने विवाहितेला माहेराहून घरी नेले. पती कामासाठी हरियाना येथे गेल्यानंतर सासऱ्याकडून पुन्हा छळ सुरू झाला. ही बाब पतीला सांगितल्यानंतर तो तातडीने गावी आला. मात्र आई-वडिलांचे ऐकूण त्याने पत्नीला मारहाण केली.

सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दाखल केली. त्यामुळे पतीकडून फोनवरून सोडून देण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. रमजान ईदच्या काळात घरी येऊन पतीने लाकडी दांड्याने मारहाण केली. याबाबतही गुन्हा दाखल केला. ९ ऑगस्ट रोजी पती सालमान माहेरी गेल्यानंतर त्याने हुंड्यात राहिलेले दोन लाख रुपये दिले तरच मुलीला नांदविण्यास नेईल. अन्यथा मुलीला तलाख देतो, असे धमकावले. काही वेळानंतर त्याने तीन वेळ तलाख म्हणून त्या ठिकाणाहून निघून गेला.
या प्रकरणी विवाहितेने जिन्सी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी होऊन मंगळवारी रोजी मुस्लीम महिला विवाह वरील हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here