२६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांच्या सामुग्रीसह अटक केली आहे. या सर्वांनी प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता.

 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले पाचही जण काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. तपास यंत्रणांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. आणखी दहशतवादी कारवायांची माहिती या दहशतवाद्यांकडे असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment