टीम, HELLO महाराष्ट्र | केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले की, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी २४ हजार ३७५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये एमबीबीएसच्या १५ हजार ७०० जागा असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वात मोठी विस्तार आहे.
याचबरोबर केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन उत्पादनासाठी सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण घेतला आहे. त्यानुसार ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर केंद्र सरकारने ६ हजार २६८ कोटी रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे.सध्या भारतात वैद्यकीय क्षेत्राची हालत बेताचीच आहे. केंद्रसरकार यावर मोठ्याप्रमाणावर निर्णय घेणार आहे आहे असे ते म्हणाले.