सातारा | सातारा पालिकेत सत्ता असो वा नसो, सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा शहरात सातत्याने असंख्य विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर आणि हद्दवाढीत समाविष्ट शाहूपुरी, शाहूनगर, गोळीबार आदी भागातील 13 विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून 1 कोटी 6 हजार 88 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
कास धरण उंची वाढवण्याचे काम मार्गी लावून सातारकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार फंड, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यासह राज्य, केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसह विविध प्रकारचे प्रश्न सातत्याने मार्गी लावले आहेत. आ. शिवेंद्रसिंराजेंनी 13 विकासकामे मार्गी लावण्यासाठी नुकताच निधी उपलब्ध करून दिला आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पोदार स्कुल ते कॅनॉलपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 9 लाख 40 हजार, धुमाळ आळी कृष्णेश्वर मंदिर येथील उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी 10 लाख, पवार कॉलनी आफळे घर, किर्वे घर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 4 लाख 98 हजार, जि.प. कॉलनी समाजमंदिरमार्गे नानासो लावंड घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 6 लाख 86 हजार, सरस्वती कॉलनी धुमाळ घर ते देशपांडे घर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 7 लाख 50 हजार, गेंडामाळ नाका येथे यशवंत नगर येथे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 7 लाख 81 हजार, समता पार्क येथे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 7 लाख 55 हजार, सुयोग कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 8 लाख 46 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. सदरबझार येथील गुलमोहर कॉलनी येथे बंदिस्त गटर बांधण्यासाठी 10 लाख मंजूर केले आहे.
गजराज कॉलनी (हॉटेल लेक व्हू) येथे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 4 लाख 30 हजार, गोळीबार मैदान सारंग कॉलनी येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 5 लाख 1 हजार, गोळीबार मैदान येथे बारटक्के घर ते कृष्णकुंज अपार्टमेंट, बंटी सुर्वे घर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 10 लाख 1 हजार, शाहूनगर येथील सि.स. नं. 163 ब, क, ड येथे पेरेंट्स स्कुल रस्ता ते अनंत कॉलनीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया आणि इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे वेळेत पूर्ण करा तसेच कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.