एकाच दिवशी १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी दिली पदवीची परीक्षा

ऑफलाईन परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ६ एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बी.ए, बीएस्सी व बीकॉमच्या १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी परीक्षा दिली. ऑनलाईन पेक्षाही ऑफलाईन परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे, हे आकडेवरुन स्पष्ट होत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा बुधवारपासून (दि.7) सुरळीतपाने सुरु झाल्या आहेत. परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या परीक्षा सुरुवात झाली आहेत. या कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत.

औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयातील परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा होत आहेत. परीक्षा केंद्रावर ह्यकोविंड संदर्भात उपाययोजनाह्य फिजीकल डिस्टिन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्याची सूचना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, एमसीए, बी.टेक, एम.टेक, एम.फार्मसी, बी.सीए, बीबीए, बीएस डब्ल्यू, बी.कॉम ई-कॉमर्स, विधि, पत्रकारिता पदवी आदी अभ्यासक्रमांचा समावेश असून या अभ्यासक्रमासाठी ३८ नवीन केंद्र आहेत. या परीक्षेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी (७ हजार ५०१), तंत्रज्ञान (१ हजार ५८९), विधी (१ हजार ४१०), औषधनिर्माणशास्त्र (३ हजार ९२२) तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या ५२१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

१६ मार्चपासून सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ लाख २७ हजार १८७ परीक्षार्थी आहेत. यामध्ये कला (३७ हजार ३४१), वाणिज्य (१ हजार ५८२), व्यवस्थापन व वाणिज्यशास्त्र (२८ हजार २७), व्यवस्थापनशास्त्र (२६७), विज्ञान (५९ हजार ४८५), तंत्रज्ञान (२१८५), सामाजिक शास्त्रे (१८२), सामाजिक शास्त्र जन विज्ञान (८५) याप्रमाणे विद्यार्थी संख्या आहे. तर ७ एप्रिल रोजी सुरु झालेल्या बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षेस एकुण ७६ हजार ४९० विद्यार्थी आहेत. यामध्ये बी.ए चे ३० हजार ७९१, बी.एस्सीचे २९ हजार ५०० व बी.कॉमचे १६ हजार १९९ विद्यार्थी आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like