Satara News : सातारा जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

farmers of Satara News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 77 हजार 165 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 4 लाख 5 हजार 280 खाती नोंदणीकृत झाली आहेत. त्यापैकी 2 लाख 17 हजार 548 खात्यांना सहकार विभागाने विशिष्ठ खाती क्रमांक दिली आहेत. यामध्ये 2 लाख 14 हजार 816 खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर 2 हजार 723 खात्यांचे आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक असून याबाबत संबंधित खातेदारांना कळविण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्या अनुषंगाने कृषी व्यवसाय फायद्याचा करणे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा शासनाच्या धोरणाचा उद्देश आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता.