मागील 24 तासात देशात एक लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; पहा ताजी आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. मागील 24 तासात देशभरात दोन लाख 34 हजार 692 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासात एक लाख 23 हजार 354 रुग्ण हे कोरोनमुक्त झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशभरातील आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 1कोटी 45 लाख 26 हजार 609 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार दोनशे वीस जण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान मागील 24 तासात कोरोना मुळे 1341 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 1 लाख 75 हजार 649 इतकी झाली आहे.

सध्या देशभरात 16 लाख 79 हजार 740 कोरोनाबाधित रुग्णांनावर उपचार सुरु आहेत. देशात पुन्हा लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत देशातल्या 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment