कुस्तीपटू सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून १ लाखांचं बक्षीस ; जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

sushil kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: दोन ओलंपिक पदक यांसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळून देशाचं नाव उज्ज्वल करणार्‍या कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या बाबत आता मात्र वेगळीच माहिती समोर येत आहे. सुशीलकुमार याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. एका गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर जामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आले असून सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापे सत्र सुरू आहे. सध्या सुशील फरार आहे त्यामुळे त्याला पकडून देणाऱ्या साठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती आणि या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनकर यांची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरविण्यात आले आहे. या घटनेनंतर सुशीलकुमार गायब झालाय. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम मध्ये हा हात्याकांड झाला आणि त्यानंतर सुशील फरार आहे. दिल्ली पोलिसांनी रात्री बक्षिसाची रक्कम जाहीर केलीय. सुशील वर जामीनपात्र वॉरंट जरी करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर लूक आऊट नोटीसही जारी झाल्यात. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती सरकारला दिली आहे. छत्रसाल स्टेडियम वर सुशील उपसंचालक म्हणून काम पाहत होता आणि तेव्हा तिथं दोन गटात हाणामारी झाली यात सागर ची हत्या झाली आहे.