दिल्ली | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. चीन पाठोपाठ कोरोना विषाणु आता भारतातही पोहोचला असून देशातील कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकात झाला असल्याचे समजत आहे.
Government of Karnataka: Four COVID-19 positive cases have been reported in Karnataka till date. All 4 cases are stable and recovering in isolation facility; Till now, 98,401 passengers have been screened in Karnataka
— ANI (@ANI) March 11, 2020
कर्नाटकातील कुलबर्गा जिल्ह्यात ७६ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक सरकारनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप वैद्यकिय अहवाल येणे बाकी आहे. वैद्यकिय अहवालानंतरच सदर वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला काय हे निश्चित होणार आहे.
दरम्यान देशात आत्तापर्यंत एकुण ६२ कोरोणा संशयीत सापडले आहेत. कोरोना विषाणुमुळे जगभर भितीचे वातावरण निर्मान झाले आहे. पुण्यातही पाच कोरोना संशयीत सापडले अाहेत. कोरोना विषाणुमुळे भयभीत न होता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन शासनाकडून करण्यात येते आहे.