खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे दुचाकीवरून मेळघाट दर्शन ; टिकटॉक व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी होळी सणानिमित्त मेळघाटात सैर सपाटा केला होता. अनेक आदिवासी पाड्यांवर होळी उत्सव साजरा करत त्यांनी आदीवासी बहूल गावांना भेटी दिल्या. मात्र काही दुर्गम भागामध्ये त्यांनी स्वतः दुचाकीवरून फिरण्याचा आनंद लुटला. त्यांचा हा दुचाकीवरून फिरण्याचा विडिओ मात्र सोशल मीडीया वर धुमाकूळ घालतोय.

राज्यभरात धुळवडीचा उत्साह बघायला मिळाला. तरुणांसह बच्चे कंपनीनं रंगाची उधळण करत धमाल केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. विशेषतः अनेक राजकीय नेत्यांनी धुळवडीच्या कार्यक्रमांना टाळलं. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत धुळवड साजरी केली.

मेळघाटातील आदिवासी समुदायातील नागरिकांसोबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी धुलिवंदनाचा आनंद घेतला. यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासींचं प्रसिद्ध कोरकू नृत्य केलं. त्यांचा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात खासदार नवनीत राणा आदिवासी महिलांसोबत नृत्य करताना दिसत आहे.

Leave a Comment