सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 872 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 360 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 881 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 66 हजार 335 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 38 हजार 801 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3642 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 26 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यासाठी नियमावली सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता
सातारा जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगितल्याप्रमाणे पुढील 15 दिवस लाॅकडाऊन राहणार आहे. मात्र त्यामध्ये कोणते नियम, अटी असतील हे आज सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी शेखरसिंह जाहीर करण्याची शक्यता आहे. रूग्णसंख्या अनेक घटकांवरील निर्बंध जैसे थे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.