रूग्णसंख्या घटली : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 990 पाॅझिटीव्ह तर 2 हजार 398 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 990 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 398 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 641 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 64 हजार 724 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 37 हजार 441 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3616 बाधितांचा मृत्यू झाला आहे.  शुक्रवारी दिवसभरात 24 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रात्री आलेल्या रिपोर्टमधील बाधितांपेक्षा दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्याची संख्या जादा असल्याने दिलासादायक आहे. जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन सुरू असून अजूनही परिस्थिती सुधारलेली पहावयास मिळत नाही.

Leave a Comment