हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (Election Strategist) आणि जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहार मधील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणांना 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी केलेल्या या घोषणेची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे.
नोकरीसाठी परराज्यात स्तलांतर हि बिहारची मुख्य समस्या आहे. त्यामुळेच याच मुद्द्यावर प्रशांत किशोर यांनी पहिले बोट ठेवलं. बेरोजगार असल्याने बिहारमधून नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांना येथे रोजगार देणार आहे. बेरोजगारांना बिहारमध्येच 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार दिला जाईल असं प्रशांत किशोर म्हणाले. बिहारमध्ये कशाप्रकारे रोजगार आणणार हे सुद्धा प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे तसेच बिहारच्या विकासाच्या रोडमॅपवरही त्यांनी भाष्य केलं. याशिवाय 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान 5 जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दुसरा संकल्प असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
वृद्धांना 2000 रुपये पेन्शन-
प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, सध्या बिहार सरकार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा ४०० रुपये देतं. ज्या दिवशी ही व्यवस्था अस्तित्वात येईल, त्या दिवशी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्री-पुरुषांना दरमहा किमान २००० रुपये पेन्शन दिली जाईल अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. प्रश्नात किशोर यांच्या या घोषणेचा विधानसभा निवडणुकीत त्यांना किती फायदा होतो ते पाहायला हवं.