दिलासादायक ! औरंगाबादेत 10 रुग्ण कोरोना मुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औंरगाबाद प्रतिनिधी l आज संपेल, उद्या संपेल… असं वाटत असताना करोनाविरुद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा 4200 झाला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. प्रशासनही तितक्याच तयारीनं या संकटाला तोंड देत आहे. यातील 507 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 287 जणांचा मृत्यू झाला आहे.

मात्र औंरगाबाद शहर व जिल्ह्यातील एकूण 30 कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत दहा रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तिघा करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन्ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या सात वर्षांच्या करोनामुक्त मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यापूर्वी एक ५९ वर्षांची महिला व दुसरी ५८ वर्षांची महिला या करोनामुक्त झाल्यामुळे त्यांना अनुक्रमे खासगी रुग्णालयातून व जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

त्याचवेळी रविवारी सात करोनाबाधित रुग्ण हेदेखील करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील पाच व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरित दोघांच्या काही चाचण्या पूर्ण करून त्यांनाही सोमवारी (२० एप्रिल) जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. संचार बंदी मुळे जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट आहे. मात्र काही नागरीक अजुन कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने प्रशासनाचा संताप वाढला आहे.