सांगली प्रतिनिधी । दहा लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दोन फेब्रुवारीला खून करण्यात आला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मयत आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे यांचे भाऊ आहेत.
याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी अरविंद पाटील, लक्ष्मण मडीवाल, दत्ता जाधव,अतुल जाधव अशी अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत.
अरविंद पाटील याचा राजकीय वाद आणि व्यक्तिगत कारण तसेच लक्ष्मण मडीवाल याचे शेत आनंदराव पाटील याने विकत घेतल्याचा राग होता. या दोघांनी पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच दरोड्यातील आरोपी दत्ता जाधव यास खुनाची सुपारी दिली. अतिशय शांतपणे पूर्वनियोजित कट आखून आनंदराव पाटील यांचा निर्जनस्थळी खून केला. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.