हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे.
सशस्त्र सीमा दलाअंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) अशा 111 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच सशस्त्र सीमा दलाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांपर्यंत करता येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी, अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
सशस्त्र सीमा दलाअंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) ही सर्व पदे भरली जाणार आहेत.
रिक्त जागा किती?
वरील पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था/बोर्ड/विद्यापीठातून 10वी/12वी/पदवी/डिप्लोमा/इंजीनियरिंग केलेले असावे. (पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार ठरविण्यात आली आहे. याची अधिक माहिती प्रसिद्ध जाहिरातीत देण्यात आली आहे.)
अर्जाची पद्धत काय?
सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवाराने अर्ज करावा.
पगार किती असेल?
उपनिरीक्षक पदानुसार पगार 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in
ऑनलाईन अर्ज कुठे करावा?
https://applyssb.com/SSBACCommCadre_2023/applicationIndex