नाशिकमध्ये खासगी बसला लागली आग, 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला. दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाले आहेत. हि बस यवतमाळ येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात (accident) झाला.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या बसने पेट घेतल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीत होरपळून मरण पावले. त्यामुळे या आगीत मृत झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

या अपघातानंतर सदर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात (accident) बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या भीषण दुर्घटनेत (accident) 10 लोक जळून खाक झाले तर 34 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेऊन या अपघाताची (accident) माहिती दिली. मात्र पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…