भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं मंत्रिपद निश्चित मानल जात आहे. अशावेळी त्यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आमदार आशिष शेलार यांच्याकडे दिली जाण्याच्या चर्चानी जोर धरला आहे.

आशिष शेलार हे भाजपमधील वजनदार आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आशिष शेलार यांचे संघटन कौशल्य चांगलं असून मुंबईत भाजपा मोठी करण्यात शेलार यांचा मोठा वाटा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदाचे सूत्रे आशिष शेलार यांना दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिला उलटून गेला तरीही मंत्रिमडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होत. एकीकडे राज्यात पूरस्थिती, शेतीचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न असताना मंत्रिमंडळच नसल्याने सरकारवर टीकेची झोड उठली होती. अखेर उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी 9 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी शक्यता आहे.