हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक पद्धतीमध्ये खूप जास्त बदल झालेला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धती बदललेल्या आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण देखील कमी केलेला आहे. पूर्वी बोर्डाचे पेपर द्यायचे म्हटले, तर तासान तास घोकंपट्टी करावी लागायची. 500 ते 700 शब्दांमध्ये उत्तर पाठ करावी लागायची. परंतु आता अभ्यासातील ही घोकंपट्टी पूर्णपणे थांबलेली आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलेला आहे. आणि हा मसुदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन देखील उपलब्ध होणार आहे. 3 जून पर्यंत हा आराखडा विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध व्हावा यासाठी हरकती देखील मागवल्या होत्या. हा आराखडा अंतिम तयार करण्यात आलेला आहे. आणि परीक्षेत आता विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी व्हावी म्हणून क्षमाधिष्ठित प्रश्नांवर अधिक भर दिलेला आहे. आणि आता हाच नियम नववी ते अकरावी आणि त्यानंतर दहावी ते बारावी साठी लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना मानवी मूल्य, जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर देखील विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होऊनच त्याच्या पुढील आयुष्यात प्रवेश करणार आहे. यासाठी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये देखील बदल केलेला आहे. आता तिसरी ते बारावी पर्यंतच्या परीक्षा या दोन सत्रात होणार आहे. आता अजून शिक्षणाचा नवीन आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार आरोग्य कला आणि व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर दिला जाणार आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून त्यांचे ज्ञान कसे वाढेल, याचे प्रयत्न केले जाणार आहे. इयत्ता तिसरीपासून व्यवसायिक शिक्षण दिले जाईल. तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्य नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे.
व्यवसायिक शिक्षणांतर्गत आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स असे विविध नवीन विषय असणार आहेत. हा आराखडा दहावी बारावी सोडून इतर सगळ्या वर्गासाठी लागू होणार आहे. त्यानंतर नवीन आराखड्यावर तुमचा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न देखील बदलणार आहे. याबद्दलची माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील आता नवनवीन ज्ञान आत्मसात करायला मिळणार आहे.
बोर्ड परीक्षा क्षमता निश्चित प्रश्न
पारंपारिक परीक्षानुसार विद्यार्थ्यांना मोठमोठे उत्तराचे प्रश्न विचारले जायचे. यावेळी विद्यार्थ्यांना ते पाठांतर करून त्याची विस्तृत अशी उत्तरे लिहिणे अपेक्षित होते. परंतु आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाणार आहे. एखादा विषय विद्यार्थ्याला किती समजला आहे. आणि त्या विषयाचा वापर तो शिक्षणानंतर आयुष्यात कसा करतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2025 – 26 नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल होऊ शकतो
बोर्डाच्या परीक्षा 10 दिवस आधी
विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये. तसेच बारावीत कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारायची संधी मिळावी. यासाठी यावर्षीची परीक्षा ही नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर घेण्याचे बोर्डाने सांगितलेले आहे. आणि 30 ऑगस्ट नंतर हरकती सूचना देखील मागवलेल्या होत्या. त्यामुळे आता जवळपास दहा हजारापर्यंत हरकती प्राप्त झालेल्या आहे. येत्या दहा दिवसात बोर्डाकडून परीक्षेचे दहा दिवस वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. परंतु बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी यादरम्यान दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च यादरम्यान घेण्याच्या नियोजन आहे. परंतु या तारखा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.