अंकाई ते रोटेगाव मार्गावर ताशी 100 कि.मी. वेगाने धावले इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मनमाड अंकाई ते रोटेगाव रेल्वे मार्गावर काल ताशी 100 किमीचा वेगाने इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावले. विद्युतीकरण झालेल्या या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा देखरेखीत चाचणी घेण्यात आली. आगामी पाच महिन्यात जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबादहुन मुंबईचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

अंकाई ते रोटेगाव मार्गावर काल सुरक्षा आणि गतीची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत चाचणी झाली. खबरदारी म्हणून या मार्गावर शुक्रवारी सायंकाळीच इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन चालविण्यात आले. रोटेगाव येथे काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करून इलेक्ट्रिक इंजिन मनमाडकडे रवाना झाले. या इंजिनला बोगीही जोडण्यात आल्या होत्या.

पुढील टप्प्यात औरंगाबाद पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मनमाड ते औरंगाबाद मार्गावरील एलेक्ट्रिक इंजिन रेल्वे धावेल. परंतु, जालन्याहून मुंबईसाठी रेल्वे धावते. त्यामुळे जालन्याहून रेल्वे औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर इंजिन बदलावे लागेल. त्या ऐवजी जालना येथे इंजिन बदली करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.