राजर्षी शाहु महाराजांच्या स्मृति शताब्दीदिननिमित्त 100 सेकंद स्तब्धता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शुभम बोडके

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज 100 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील शाहु चौकाचा परिसर 100 सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी स्तब्धता पाळत शाहू महाराजांना आदरांजली वाहली.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने हे वर्ष ‘कृतज्ञतापर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासनाने आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी येथील शाहु चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.

प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, आदरणीय यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव भोजगांवकर, जयंत बेडेकर, प्रशांत यादव, प्रमोद पाटील, राकेश शहा, गंगाधर जाधव, गोविंदराव थोरात, सतीश भोंगाळे, नवाज सुतार, अमोल सूर्यवंशी, वैभव हिंगमिरे, सर्जेराव पाटील, सचिन चव्हाण, निखिल शिंदे, भारत थोरवडे, मंगेश वास्के, तारळेकर आदींसह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment