राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं; कोर्टाने राज्य सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मातोश्रीवर हणुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिल्यानंतर अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र याप्रकरणी कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा कलम लावणे चुकीचे आहे असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.

‘राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही,’ असं निरीक्षण कोर्टाने नोंदवले. पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यांनी कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे.असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं

दरम्यान, काल तब्बल १२ दिवसानंतर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटता झाली आहे. मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे नवनीत राणा याना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रवी राणा तातडीने त्यांना भेटायला गेले. यावेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत नवनीत राणा याना डिस्चार्ज मिळत नाही, तोपर्यंत राणा दांपत्य मुंबईतच थांबणार आहे.