सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 19 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 686 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 15 हजार 181 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.71 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 105 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 6 हजार 168 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 91 हजार 839 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 966 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 26 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा वाढलेला आहे. मात्र टेस्ट वाढल्याने बाधित वाढलेले आहेत. कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट मात्र स्थिर आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊनमध्ये बदल नसल्याचे जिल्हाधिकारी माहीती कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.