औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसल्याचे कारण दाखवत अकरा अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विशेष म्हणजे काल विद्यापीठाचा 63 वा वर्धापन दिन होता याच दिवशी हा दुर्दैवी निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अशी टीका अनेक शिक्षण तज्ञांनी केली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्र-कुलगुरू शाम शिरसाट, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. नरेंद्र काळे, सुनील निकम आदी सदस्य उपस्थित होते. या बैठकींमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून विद्यापीठातील विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या काही अभ्यासक्रमास अल्पसा प्रतिसाद असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत राहिला. शैक्षणिक वर्ष 2016-17 ते 2020-21 या आज शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात विभाग प्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत 11 अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खालील अभ्यासक्रम केले बंद –
एम एस्सी (मॅथेमॅटीक्स), एम.टेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डिबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बी.ए. इंटरनॅशनल (जर्नालिझम ॲंड आर्ट ॲन्ड सायन्स युनिस्को कोर्स), बी.एड., एम.एड. इंटीग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टिव्ही प्रोडक्शन ॲंड बेसीक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बी.ए. (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ॲंड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी ॲंड जीए), एम एस्सी नॅनो टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रम बंद करण्यात आले आहेत.