कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द गावचे हद्दीत तावळदारे नावचे शिवारातून पाणी आणण्यास सांगून इनोव्हा गाडीतून 11 शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या शेळ्यासह चारचाकी गाडी असा पाटण पोलिसांनी 21 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पाटण तालुक्यातून चोरलेल्या शेळ्या व दोन आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी, दिवशी खुर्द येथे शेतात आनंदा कोंडी यादव यांच्या चरावयास घेवुन गेले होते. चारचाकी गाडीतुन आलेल्या अज्ञात इसमानें पाणी आणण्यास सांगितल्याने श्री. यादव हे पाणी आणन्याकरीता गेले होते. याचवेळी चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात इसमानी फिर्यादी 11 शेळ्या चारचाकी गाडीतुन चोरुन नेल्या असल्याची गुन्हा पाटण पोलीस ठाण्यात दि. 23 जानेवारी रोजी दाखल करण्यात आलेला होता.
नमुद गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक- विकास पाडळे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरु होता. सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान तांत्रिक व गोपनिय माहीतीच्या आधारे तपास करुन शाहुपुरी, कोल्हापुर येथे सापळा लावुन सदर गुन्ह्यातील शिवानंद पांडुरंग कुंभार (रा. करवीर- कोल्हापूर) आणि दीपक शिवाजी गायकवाड (रा. हातकणंगले) या दोन आरोपींना पकडण्यात आले. त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेली इन्होव्हा कार जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींनी चोरून नेलेल्या 11 शेळ्या असा एकुण 21 लाख 46 हजार रुपयांचा मुददेमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार गोरखनाथ साळुंखे हे करीत आहेत.
पाटण पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वैभव पुजारी, मुकेश मोरे, उमेश मोरे, श्रीकृष्ण कांबळे, हणमंत नलवडे यांनी सदरची कारवाई केली. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील यांनी अभिनंदन केले.