‘या’ शहरात उभारले जाणार 11 मजली रेल्वे स्थानक; बस, मेट्रो, शॉपिंगसह इतर सुविधांची होणार भरमार !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उपनगरांतील प्रमुख शहरामध्ये ठाण्याला गणले जाते. या ठिकाणी आता तब्बल 11 मजली रेल्वे स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या रेल्वे स्थानकात केवळ रेल्वे गाड्यांची ये-जा नाही, तर एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्थानकात मॉल, कार्यालयीन परिसर, रिटेल दुकानं, फूड कोर्ट, गेमिंग झोन आणि इतर मनोरंजनाच्या सुविधांचा समावेश असेल. हा प्रकल्प ठाण्यातील कनेक्टीव्हिटी सुधारण्यासोबतच सरकारला महसूल मिळवण्याचे महत्त्वाचे साधन ठरेल. याचसोबत लोकांना विविध सेवा सुविधांचा वापर एकाच ठिकाणी घेता येणार आहे.

30 जून पर्यंत पूर्ण होणार –

ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 10 ए जवळ 9000 वर्ग मीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. 24,280 वर्ग मीटर अतिरिक्त जागा 60 वर्षांच्या लीजवर दिली जाईल. या प्रकल्पाच्या पूर्णतेची अंतिम तारीख 30 जून 2026 असं निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत स्थानकाला बस आणि मेट्रो मार्गाशी जोडण्यात येईल. प्रकल्पात स्थानकाच्या बेसमेंटमध्ये पार्किंगसाठी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, स्थानकाच्या तळमजल्यावर बस गाड्यांसाठी डेक तयार करण्यात येईल. येथून स्थानिक बस सेवांचा लाभ घेता येईल. वरील मजल्यांवर कमर्शिअल आणि रिटेल दुकानं, शॉपिंग सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

कनेक्टीव्हिटी सोबत विविध सुविधा मिळणार –

रेल्वे स्थानकाला अन्य सार्वजनिक वाहतूक सेवांशी जोडण्यात येईल. 2.24 किलोमीटरचा एलिव्हेटेड मार्ग तयार केला जाईल, जो थेट इस्टर्न एक्सप्रेस-वेशाशी जोडला जाईल. यामुळे, रेल्वे स्थानकावरून थेट सार्वजनिक वाहतूक साधता येईल. प्लॅटफॉर्म 10 जवळ बससाठी विशेष डेक तयार करण्यात येईल, ज्यामुळे रेल्वे प्रवासी सहज बस पकडू शकतील. या प्रकल्पामुळे ठाण्यातील लोकांना केवळ कनेक्टीव्हिटी सुधारण्याची संधी मिळणार नाही, तर विविध सुविधाही मिळतील. इमारतीत फूड कोर्ट, रेस्तरां, लहान मुलांसाठी गेमिंग झोन, कार्यालयीन जागा, हॉटेल्स आणि कोचिंग इन्स्टिट्यूट्सची सुविधा उपलब्ध होईल. हा प्रकल्प रेल्वे विकास प्राधिकरण आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने उभारला जात आहे, ज्यामुळे ठाण्यातील परिवहन आणि सुविधा क्षेत्रात एक नवीन आदर्श उभा होईल.