दीड वर्षानी अपहरण झालेल्या नातीचा आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

Kidnapped
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. त्यानंतर दीड वर्षांनी पीडित मुलीने फोन करून आपल्या आजोबांशी संपर्क साधला. यावेळी तिने फोनवरून आजोबांना तिचा उत्तर प्रदेशातील पत्ता सांगितला. यानंतर पोलीस संबंधित मुलीच्या शोधात तिने सांगितलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत.

मुलीच्या आजोबांचे नाव भिमसिंग गंगाराम कोळी आहे. ते यावलमधील धोबीपाडा याठिकाणी राहतात. 19 नोव्हेंबर 2019 रोजी भिमसिंग यांच्या नातीचे अपहरण करण्यात आले होते. मुलगी जेव्हा गायब झाली तेव्हा ती सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत गेली होती. शाळेत बॅग ठेवल्यानंतर काही कामानिमित्त बाहेर आली तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिला रिक्षात बसवून तिचे अपहरण केले.यानंतर त्या मुलीला सगळीकडे शोधण्यात आले पण ती कुठेच सापडली नाही. आपल्या नातीचे अपहरण झाल्याच्या धक्क्याने मुलीच्या आजीची मानसिकता बिघडली होती. या दरम्यान 24 एप्रिल रोजी अपहरण झालेल्या मुलीने आपल्या आजोबांना संपर्क साधला आणि ती जिकडे आहे तिकडचा पत्ता दिला.

24 एप्रिल रोजी सायंकाळी 4 त्या मुलीने आपल्या आजोबांना फोन केला होता. तेव्हा तिने फोनवर मी उत्तर प्रदेशातील नवीनसिंग उर्फ गुड्ड रामा शंकरसिंग नावाच्या व्यक्तीसोबत असून तो बलकजगंज देरवा चौक, सरकारी दवाखान्यामागे गोरखपुर याठिकाणी राहतो असे सांगितले.अपहरण करणाऱ्या व्यक्तीने तुझ्या वडिलांकडं सोडतो असे सांगून तिला भुसावळ येथून रेल्वेने उत्तर प्रदेशात नेल्याचे मुलीने सांगितले आहे. या घटनेची माहिती पीडितेने आपल्या आजोबांना सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावल पोलीस पीडितेच्या शोधात उत्तर प्रदेशात रवाना झाले आहेत.