महिला अत्याचाराबाबत NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर; दिवसाला होतात 116 महिलांवर अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. महिलांच्या बाबत अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आजकाल गुन्हेगारी पेक्षा महिलांचा छळ करण्याची वृत्ती वाढताना दिसत आहे. अशातच आता नॅशनल क्राइम रेकॉर्डिंग राज्यामध्ये महिलांच्या अत्याचारांच्या घटनांची आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दर दिवसाला जवळपास 116 महिलांवर अत्याचार होत आहे. महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकार सत्तेत असल्यापासून महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे आता कोणत्याही सरकार असल्यास महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे.

2019 सालापासून महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते. तेव्हापासून दररोज महिला होण्याच्या घटना वाढत चाललेले आहे. यामध्ये दिवसाला सरासरी 126 घटना घडतात. कोरोना काळामध्ये म्हणजेच 2021 साली राज्यात दिवसाला जवळपास 109 महिला अत्याचाराच्या घटना दिसत होत्या. त्यानंतर 2022 पर्यंत ही संख्या 120 घटनांवर गेली . अठरा वर्षावरील जास्त वय असणाऱ्या मुलींना यामध्ये त्रास होत आहे. 2022 मध्ये 1317 महिला अत्याचाराच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. 2023 मध्ये 12208 गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच 2022 मध्ये महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या ही 116 होती. तर 2023 मध्ये ही संख्या 79 एवढी झाली या गुन्ह्यांमधील आरोपींना पोलिसांकडून अटक केले जाते. तसेच त्यांच्यावर कारवाई होते. परंतु महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

2020 मध्ये राज्यात 31 हजार 701 महिलांवर अत्याचार झाले. म्हणजेच दिवसाला जवळपास 88 घटना घडल्याची नोंद आहे. त्याचप्रमाणे 2021 मध्ये राज्यात जवळपास 39 हजार 266 महिलांवर अत्याचार झाले. यामध्ये दिवसाला जवळपास 109 घटना घडत असल्याची माहिती समोर आलेली आहे. 2022 मध्ये राज्यात 22843 महिलावर अत्याचार होतो. म्हणजे दिवसाला सरासरी 126 घटना घडत होत्या.

तसेच 2022 जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या काळामध्ये जवळपास 20830 घटना घडलेल्या आहेत. तसेच 2023 मध्ये देखील एवढी सरासरी मानली जात आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये 2021 पासून वाढ झालेली आहे. त्यानंतर ही वाढ असूनही कायम आहे. आपण एका प्रगतशील राज्यात राहतो. या ठिकाणी प्रत्येक युवकाला साक्षर आणि रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. तसेच वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. परंतु आजही कुठेतरी महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपले सरकार हे असमर्थ ठरत असल्याचे चित्र समोर दिसत आहे.