औरंगाबाद | आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी करण्यात आलेल्या 25% जागांवरील मोफत प्रवेश आला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी तीन वेळा मुदतवाढ देऊनही 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत.
आरटीआय प्रवेशासाठी गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीनेच लकी ड्रॉ काढण्यात आला नियमांचे पालन करत दिलेल्या मुदतीत पात्र पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी आरटी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक 31 जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून तीन वेळा मुदतवाढ करूनही औरंगाबाद मध्ये 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत.
शनिवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादमध्ये 2 हजार 438 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. तर 1470 जणांचे तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तरीदेखील 1187 जागा रिक्त राहिल्या आहेत. सोमवारपर्यंत प्रवेशासाठीची पुढील प्रक्रिया कळविण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.