हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 11th Class Admission। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. दहावीनंतर अकरावीला म्हणजेच कॉलेजला जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता असते. त्यादृष्टीने ऍडमिशन कुठं घ्यायचं या तयारीला विद्यार्थी लागले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत राबवली जात आहे. मात्र ज्या संकेतस्थळावरून प्रवेश अर्जाची प्रक्रिया करावी लागते, तेच पोर्टल बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आता यावर उपाय म्हणून येत्या 26 मे रोजीपासून इयत्ता अकरावीच्या परीक्षेसाठीचे पोर्टल चालू करण्यात येणार आहे.
8 जूनला अंतिम यादी जाहीर होईल- 11th Class Admission
तसं बघितलं तर 21 मे रोजीपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झाली होती. मात्र हे पोर्टलच बंद पडल्याने आता 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंदच असणार आहे. राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. 5 जून रोजी पहिली जनरल गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, 6 ते 7 जून या तारखांना विद्यार्थ्यांना हरकत नोंदवून तक्रार करता येईल आणि 8 जून या दिवशी अंतिम मेरिट लिस्ट अर्थात गुणवत्ता यादी जाहीर होईल. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचं महाविद्यालय निवडता येणार आहे. 11th Class Admission
प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. वेबसाईट सुरू झाल्यानंतर व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे.
खरं तर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची जास्त धावपळ होऊ नये यासाठी यंदा संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबविण्यात आली. या निर्णयामुळे एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. आता सोमवार पासून नव्याने सुरु होणाऱ्या अर्ज पद्धतीत तरी कोणतीही अडचण येऊ नये अशी विद्यार्थ्यांची इच्छा असेल.