हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या लोकसभेतील 19 खासदारांपैकी तब्बल 12 खासदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात सामील झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या 12 खासदारांमध्ये कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, राहुल शेवाळे, भावना गवळी, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आता उद्धव ठाकरेंकडे फक्त विनायक राऊत, अरविंद सावंत ,राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहाच खासदार सोबतीला आहेत.
Maharashtra Chief Minister Eknath Shinde today met 12 MPs of Shiv Sena (Shinde faction) in Delhi pic.twitter.com/uGQFjv2w5U
— ANI (@ANI) July 19, 2022
दरम्यान, या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी आणि भावना गवळी यांची प्रदोत पदी नेमण्याची मागणी खासदारांनी केली. त्यानुसार या सर्व खासदारांनी ओम बिर्ला याना पत्र लिहिलं आहे.