Satara News : खंबाटकी घाटात 12 चाकी ट्रक आडवा, वाहनांच्या रांगा लागल्या

Khambataki Ghat Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटात दोन ट्रकचा अपघात झाला आहे. घाटमाथ्यावर 2 ट्रकचा भीषण अपघात झाल्याने ट्रक पलटी झाला आहे. घाटात 12 चाकी ट्रक रस्त्यावर मध्यभागी आडवा झाल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू असून आहे.

घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेला येणाऱ्या मार्गावर दोन्ही ट्रकमध्ये अपघात झाला आहे. यामध्ये ट्रकमधील दोन्ही ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावर ट्रक हटविण्यासाठी क्रेन दाखल झाल्या असून युध्दपातळीवर काम सुरू आहे. परंतु या अपघातामुळे घाटातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकांना सूचना करत आहेत. तसेच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अपघातामुळे घाटात जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा खंबाटकी घाटात लागल्या आहेत. वारंवार या ठिकाणी होत असलेल्या अपघातामुळे वाहन चालकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.