Monday, January 30, 2023

धक्कादायक ! वसईतील 12 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

वसई : हॅलो महाराष्ट्र – वसईमधील समर्थ रामदास नगरमध्ये एक हैराण आणि धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. यामध्ये सोमवारी संध्याकाळी याठिकाणी एक आई आपल्या 12 वर्षीय मुलावर तो अभ्यास करत नसल्याने ओरडली यानंतर त्या मुलाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

समर्थ रामदास नगरमधील ईस्टव्हिव अपार्टमेंटमध्ये शुभम शिव प्रसाद हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो पाचवीमध्ये शिकत होता आणि एकुलता एक मुलगा होता. सोमवारी संध्याकाळी तो अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला ओरडली या गोष्टीचा त्याला राग आला. यानंतर काही वेळाने शुभमने बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

या घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शुभमच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या अगोदरदेखील शुल्लक कारणावरून लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.