हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : आता आपण लवकरच नवीन वर्षांत प्रवेश करणार आहोत. अशातच आता RBI ने देखील जानेवारी महिन्यासाठीच्या बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट (Bank Holidays) जाहीर केली आहे. ज्यानुसार जानेवारीमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, इथे हे लक्षात घ्या कि, यापैकी काही सुट्ट्या या फक्त प्रत्येक राज्यानुसार स्थानिक पातळीवरच असतील.
हे लक्षात घ्या कि, भारतातील बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. याव्यतिरिक्त, सार्वजनिक सुट्ट्या, राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्ट्याच्या दिवशी (ज्या प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या असतात) बँका बंद असतात. अशा परिस्थितीत, जर आपल्याकडे बँकांच्या सुट्ट्यांबाबत आधीच माहिती असेल तर बँकेचे काम योग्य वेळी पार पाडता येईल. Bank Holidays
जानेवारी 2023 मधील सुट्ट्यांची लिस्ट तपासा (Bank Holiday)
1 जानेवारी 2023 : नवीन वर्ष
5 जानेवारी 2023 : गुरु गोविंद सिंग जयंती (हरियाणा, राजस्थान)
11 जानेवारी 2023 : मिशनरी डे (मिझोरम)
12 जानेवारी 2023 : स्वामी विवेकानंद जयंती (पश्चिम बंगाल)
14 जानेवारी 2023 : मकर संक्रांती (अनेक राज्ये)
15 जानेवारी 2023 : पोंगल/माघ बिहू (आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तमिळनाडू, आसाम)
22 जानेवारी 2023 : सोनम लोसार (सिक्कीम)
23 जानेवारी 2023 : नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती (त्रिपुरा, पश्चिम बंगाल)
25 जानेवारी 2023 : राज्य दिन (हिमाचल प्रदेश)
26 जानेवारी 2023 : प्रजासत्ताक दिन (संपूर्ण भारत)
31 जानेवारी 2023: मी-दाम-मी-फी (आसाम) Bank Holidays
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुक करून मिळवा दुप्पट बोनस !!!
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 400 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा 750GB डेटा
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न, कसे ते जाणून घ्या
Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा