मामे भावाने 13 वर्षीय मुलीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, अशा प्रकारे झाला खुलासा

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामेभावाने लैंगिक अत्याचार (Rape) केले. यातूनच ती आठवड्यांची गरोदर राहिली. हा धक्कादायक प्रकार 2 मार्च ते 11 जून 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी घडला होता.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने रविवारी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी महिलेच्या भावाच्या मुलाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या 13 वर्षीय मुलीवर फिर्यादीच्या भावाच्या मुलाने लैंगिक अत्याचार (Rape) केले. या लैंगिक अत्याचारामुळे फिर्यादीची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

फिर्यादी महिलेची बहीण पिंपरी – चिंचवड शहरात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी ही सुट्टीनिमित्त रविवारी तिच्या मावशीकडे पिंपरी-चिंचवड या ठिकाणी आली होती. त्यानंतर या मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागले म्हणून तिच्या मावशीने तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ती 18 आठवड्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेऊन आरोपी भाच्याच्या विरोधात तक्रार (Rape) दाखल केली.

हे पण वाचा :
IPL Media Rights: 44 हजार कोटींना टीवी-डिजिटल राइट्सची विक्री, ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी

खुशखबर !!! Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली; सोमय्यांचा गंभीर आरोप

मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार