व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…; मनसेचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या वारी वरून मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टीका केली आहे. अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो असा टोला त्यांनी लगावला.

गजानन काळे यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो. विधानपरिषदेत तरी एमआयएम व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शिवसेना सातत्याने अयोध्येला जात आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला गेले होते. आणि आता आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असून सायंकाळी 5:30 वाजता ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत.