गज्या मारणेच्या टोळीतील 14 जण पोलिसांच्या ताब्यात, पैशाच्या वसुलीसाठी चाैकशीत निष्पन्न

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात टाळेबंदी व जिल्हाबंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले.  वाई येथे हे सर्व जण पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्‍यावर दुपारी 14 जणांना ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू होते. उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे 14 जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्‍यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या चौदा जणातील अनेक जण गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली. या सर्वांकडे कसून चौकशी सुरू आहे. उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता व त्यांना अटकही करण्यात आली नव्हती.

पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. या दोघांनी संबंधित चौदा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पुण्यातील पोलिस अहवालाच्या प्रतीक्षेत उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र, त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिस प्रथम दर्शनी दाखल करणार आहेत. नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहेत. वाई पोलिस ठाण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे व पथक दाखल झाले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here