व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चोवीस तासात शेळ्या चोरट्यास अटक, दोघेजण पळून गेले

कराड तालुक्यातील शहापूर येथील घटना

कराड | कराड तालुक्यातील शहापूर येथील पाच शेळ्या चोरल्याचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात मसूर पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आले आहे. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह अटक केली. सदरची घटना गुरुवार, दि. २९ रोजी घडली. नईम सलीम मुल्ला (रा. ओगलेवाडी) अटक केलेल्याचे नाव आहे. तर अन्य दोघे जण पळून गेले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी शरद शामराव आखाडे यांच्या तीन शेळ्या व बोकड, तसेच अकबर मुल्ला यांच्या दोन वर्षाचे बोकड असा एकूण १८ हजार रुपयांचे पाच बकरी चोरट्यांनी बुधवार, दि. २८ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास, चोरून नेले होते. याबाबत मसूर पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला होता.

उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस नाईक राजेंद्र माने, अमोल देशमुख, प्रशांत पवार यांनी ओगलेवाडीत जाऊन सापळा रचला. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीस अटक केली आहे.