फलटण | महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटण शहरातील विविध लोकोपयोगी आणि लोकहिताच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना.अजित पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 15 कोटी रुपयांचा भरीव निधी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दिला आहे. याबाबतची माहिती मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये यापूर्वीही मंजूर राज्य शासनाने फलटण शहर व तालुक्यासाठी विविध योजनांमधून नळ पाणी पुरवठा योजना, रस्ते, आरोग्य सुविधा, पाणंद रस्ते, प्रा. शिक्षण विशेषत: प्रा. शाळांच्या इमारती यासाठी यापूर्वीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहर व तालुक्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग नव्याने जात आहेत तर सध्याच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होत असल्याने दळणवळणाच्या सुविधांमध्ये भरीव वाढ होत असल्याचे तसेच त्यासाठीही केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
डॉ. आंबेडकर समाज मंदिर व सुपर मार्केट फेर उभारणीसाठी 7.5 कोटी रूपये तर दत्त नगर ते शिंदे बिल्डिंग ते दगडी पूल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर नाला बंदिस्त करणे कामासाठी 2.5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2.5 कोटी
आणि प्रिय दर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे अत्याधुनिक अँक्वास्टिक ध्वनी यंत्रणा बसविणे साठी 2.5 कोटी रुपये असे एकूण 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.