हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता मार्च महिना संपून लवकरच एप्रिल महिना सुरु होणार आहे. नुकतेच RBI कडून एप्रिल 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट रिलीज करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, एप्रिलमध्ये बँकेच्या कामांसाठी शाखेत जाण्याआधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा. या लिस्ट मधील माहितीनुसार एप्रिल 2023 मध्ये बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. Bank Holiday
एप्रिलमधील सुट्ट्यांमध्ये 4 सुट्ट्या या रविवार असल्याने मिळणार आहेत. तसेच, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. मात्र संपूर्ण देशातील बँका एकाच वेळी 15 दिवस बंद राहणार नाहीत. RBI च्या वेबसाइटवरील सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमधील आहेत. तयामुळे या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. Bank Holiday
सध्याच्या काळात बँकेची बहुतेक कामे ऑनलाईनच केली जातात, मात्र तरीही अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी बँकेच्या शाखेमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत, आपल्याला बँकांच्या सुट्ट्यांची माहिती असणे मच्यासाठी महत्त्वाचे आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल. चला तर जाणून घेऊयात की एप्रिल 2023 मध्ये कोण-कोणत्या राज्यांमध्ये बँका कधी कधी बंद राहतील. Bank Holiday
1 एप्रिल : बँक खाते क्लोझिंगमुळे बँकांना सुट्टी
2 एप्रिल : रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुटी
4 एप्रिल: महावीर जयंतीनिमित्त अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी.
5 एप्रिल: बाबू जगजीवन राम यांची जयंती, तेलंगणा झोनमध्ये बँकेला सुट्टी
7 एप्रिल: गुड फ्रायडेमुळे आयझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि केरळ झोनमध्ये बँकेला सुट्टी
8 एप्रिल : बँकांना दुसरा शनिवार असल्याने साप्ताहिक सुट्टी
9 एप्रिल : रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुटी
14 एप्रिल: अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, तेलंगणा, इंफाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, पणजी आंबेडकरांच्या स्मरणार्थ पाटणा, रांची, श्रीनगर आणि केरळमध्ये जयंती बँकेला सुट्टी.
15 एप्रिल: बोहाग बिहूमुळे आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि केरळ झोनमध्ये बँकांना सुट्टी
16 एप्रिल : रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुटी
18 एप्रिल: शब-ए-कदरच्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगर झोनमध्ये बँका बंद.
21 एप्रिल : ईदनिमित्त आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि केरळमध्ये बँका बंद.
22 एप्रिल 2023: चौथ्या शनिवारमुळे बँकांना साप्ताहिक सुटी
23 एप्रिल 2023: रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुटी
30 एप्रिल 2023: रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुटी Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले, पहा आपल्या शहरातील आजचे नवे दर
शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Ration Card शी आधार लिंक करण्याला मिळाली मुदतवाढ, जाणून घ्या त्यासाठी प्रक्रिया
Stock Market : आता भारतात बसून अशा प्रकारे अमेरिकन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तपासा