सातारा लोकसभा मतदार संघात रस्ते व पूलासांठी 16 कोटी 60 लाख मंजूर : श्रीनिवास पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्‍या माहे मार्च- 2022 च्‍या अर्थसंकल्‍पामध्‍ये सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई, जावली व कराड तालुक्‍यातील रस्‍ते व पूलाच्‍या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 16 कोटी 60 लक्ष निधी उपलब्ध झाल्याने सदर कामाला गती मिळणार आहे.

कराड तालुक्यातील खंडाळा- कोरेगांव कराड- सांगली- शिरोळ रस्‍ता रा. मा. 142 वरील कि. मी. 85/700 येथील तारगांव फाटा चौकाची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी निधी मंजूर झाला आहे. जावली तालुक्यातील सातारा- कास- बामणोली- गोगवे- तापोळा- महाबळेश्‍वर रस्‍ता (प्रजिमा-26) कि. मी. 43/ 40, 44/ 800, 48/ 600 व 52/ 750 मध्‍ये लहान पुलांचे पोहोचमार्गासह बांधकाम करणे 2 कोटी 66 लक्ष, वाई तालुक्यातील प्रजिमा-19 ते एकसर -कुसगाव- पसरणी- राजेवाडी- वाई- बावधन- कणूर- दरेवाडी रस्‍ता प्रजिमा- 92 कि. मी. 2/ 800 ते 11/ 500 (भाग- एकसर ते वाई) रस्‍त्‍याची सुधारणा करणे 3 कोटी 80 लक्ष,
वाई तालुक्यातील चवणेश्‍वर ते कवठे पोल्ट्री फार्म ते राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 4 ते बोपेगाव स्‍मशानभूमी खानापूर ते राज्‍यमार्ग- 119 ते केंजळ -गुळुंब- वेळे- भिलारवाडी ते सोळशी रस्‍ता प्रजिमा- 146 कि. मी. 2/ 00 ते 9/ 00 (भाग- कवठे पोल्‍ट्री फार्म ते रा. मा. 119) रस्‍त्‍याची सुधारणा करणे 7 कोटी 60 लक्ष असा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कामांना भरीव निधी मंजूर झाल्यामुळे ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या मार्गी लागून दळणवळण सोयीस्कर होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment