प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, 16 आमदार अपात्रच होतील; झिरवळ यांनी सांगूनच टाकलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्यतो येत्या 10 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर केला जाऊ शकतो. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलेलं असतानाचा आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. हे प्रकरण न्यायालयाने माझ्याकडे दिले तर 16 आमदार अपात्रच होतीलच असं म्हणत त्यांनी लपवायला काही ठेवलंच नाही.

नरहरी झिरवळ नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल त्यांना केला असता माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकतं? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. पण हे प्रकरण माझ्याकडे येऊ दे तर खरं . . माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असं बेधडक उत्तर झिरवळ यांनी दिले. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे हे सुद्धा सांगायला ते विसरले नाहीत.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. यामधील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे येत्या 15 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य या निकालाकडे लागलं आहे. त्यामुळे हा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.