भयावह..!! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून अत्याचार; ५ जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक बलात्कार प्रकरणातील बहुतेक आरोपी हे रिक्षाचालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सोलापूर-विजापूर रोडवरील एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती. एका सुज्ञ नागरिकाने जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेतले आणि रडण्याबाबत विचारणा केली असता तिने बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती टिपरे या करीत आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.