हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुगलकडून नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. सुविधांबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षितेची काळजी घेताना देखील दिसते. त्यामुळेच कंपनीने आपल्या प्ले स्टोअर वरून 17 ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्ले स्टोअरवर असे काही ॲप आहेत जे युजर्सचा डेटा हॅक करत आहेत. त्यामुळे अशा ॲप्सला काढून टाकण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे गुगलने 17 ॲप्सला टारगेट करून त्यांच्यावर बंदी आणली आहे.
ESET संशोधन अहवालानुसार, या ॲप्सवर बंदी आणण्यापूर्वी ते Google Play वरुन जगभरात 1 कोटीहून अधिक डाउन केले गेले होते. अशा फसव्या अँड्रॉइड लोन अॅप्सना गुगलने स्पायलोन अॅप्स असे नाव दिले आहे. या ॲप्सच्या माध्यमातूनच गुगल युजरचा वैयक्तिक राहता चोरीला जात होता. ज्यामुळे युजरचे फोन हॅक झाल्याची देखील घटना घडली होती. त्यामुळे यावर कठोर कारवाई करत गुगलने 17 ॲप्स बंद करून टाकले आहेत.
दरम्यान, या फसव्या अॅप्सच्या माध्यमातून आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामधील युजरला देखील टार्गेट करण्यात आले होते. ही बाब निदर्शनात आल्यानंतर गुगलने हे ॲप्स प्ले स्टोअरवरून उडवून टाकण्याचा निर्णय घेतला. जर हे ॲप्स यूजरच्या फोनमध्ये देखील इन्स्टॉल असतील तर गुगल त्या ॲप्सला देखील फोनमधून हटवून टाकणार आहे.