वॉशिंग्टन । अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच १बी व इतर प्रकारचे व्हिसा २०२०च्या अखेरीपर्यंत थांबवल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना या फटका बसला आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात १७४ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ७ जण अल्पवयीन आहेत. भारतीय नागरिकांच्या समुहानं ट्रम्प ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
वास्डेन बॅनियास यांनी १७४ भारतीय नागरिकांची बाजू न्यायालयात मांडलीय ते म्हणाले की, ‘एच-1बी/एच-4 व्हिसावरील बंदी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचवेल. तसेच कुटुंबांना वेगळंही करु शकतात. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा असं या याचिकेत म्हटलं गेलं आहे.
ही याचिका दाखल झाल्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया डिस्ट्रिक्ट न्यायालयाचे न्यायाधीश केतनजी ब्राउन जॅक्सन यांनी बुधवारी विदेश मंत्री माइक पोम्पिओ आणि होमलँड सुरक्षा विभागाचे मंत्री चाड एफ वोल्फ यांच्यासह मंत्री यूजीन स्कालिया यांना समन्स पाठवला आहे. १७४ भारतीयांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात मंगळवारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मंगळवारी अमेरिकेतील काही खासदारांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.