कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 18 कोटी रूपये खर्चून पूर संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या बंधाऱ्याची आज स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिकांसह पाहणी केली. जवळपास 2100 ते 2200 मीटर परिसर कृष्णा व कोयना नदीचा किनाऱ्यावर गॅबियन बंधारा बांधण्यात येत आहे. या बंधाऱ्यामुळे कराड शहरात पावसाळ्यातील पूर परिस्थिती कमी होण्यास मदत होणार असल्याचे माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
या संरक्षक भिंतीचे काम पाहणीवेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी युवक काॅंग्रेस राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस प्रदीप जाधव, शहर अध्यक्ष ऋतुराज मोरे, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, श्रीकांत मुळे, अशोकराव पाटील, फारूख पटवेकर, अमीर कटापुरे, युवानेते राहूल चव्हाण आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जुन्या कोयना पूलापासून ते नव्या कृष्णा पुलापर्यंत चार मीटरचा वाॅक वे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून मुंबईतील चाैपटी सारखे किंवा गुजरातप्रमाणे रिव्हर पाॅंईट डेव्हलपमेंट होणार आहे. जल संधारण संशोधन खात्याने मंजूर केलेले डिझाईन प्रत्यक्षात येत आहे. याठिकाणी पूर संरक्षण या भितीमुळे होणार आहे तर दुसरीकडे वाॅक वे नागरिकांसाठी होणार आहे. अशा प्रकारे डिझाईन करण्यात येईल.