औरंगाबाद – रशियाने युक्रेन वर हल्ला केल्यामुळे मराठवाड्यातून विविध कामांसाठी तिकडे गेलेले 109 जण अडकुन पडले होते. त्यापैकी 18 जण मायदेशी परतले असून अद्याप 91 जण युक्रेन आणि बाजूचा राष्ट्रात अडकले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्या लोकांना मायदेशी अन यासाठी शासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
युक्रेनमध्ये शिक्षण आणि इतर कामांसाठी गेलेले तब्बल 109 जण अडकून पडले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 16, जालना येथील 7, परभणी 6, हिंगोली 2, नांदेड 34, बीड 4, लातूर 28 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे. या 109 पैकी काही जणांनी युक्रेनची सीमा पार करून दुसऱ्या देशात आश्रय घेऊन तेथून ते मायदेशी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 18 जण स्वगृही परतले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 3, जालना येथील 4, परभणी 6, नांदेड 6, बीड 1, लातूर 2, उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 जणांचा समावेश आहे. अद्याप 91 जण अडकून पडले असून, या 91 जणांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात आहेत.
औरंगाबादचे चार विद्यार्थी दिल्लीत –
औरंगाबादेतील भूमिका शार्दुल, श्रुतिका चव्हाण आणि प्रतीक ठाकरे हे तीन विद्यार्थी तसेच बीड जिल्ह्यातील अनिलकुमार तेजराम हाही दिल्लीला पोहोचला आहे. महाराष्ट्र सदनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच ते औरंगाबादला दाखल होणार आहे. तर परभणी जिल्ह्यातील सहा विद्यार्थी युक्रेनमधून परतले असून त्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.